Mollywood: बॉलिवूडला टक्कर देत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा नाच ग घुमा आता OTT वर..! पहा या OTT प्लॅटफॉर्म वर..
मराठी चित्रपट सृष्टी सध्या एका मागोमाग हिट चित्रपट देत आहे.नुकताच प्रदर्शित झालेला मुंज्या चांगलाच गाजतोय.तर मागील महिन्यात प्रदर्शित झालेला मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव मुख्य भूमिकेत असलेला ‘नाच गं घुमा’ हा मराठी चित्रपटाने जोरदार कमाई करत बॉलिवूड ला देखील चांगलीच टक्कर दिली आहे.घरातील कामवाली बाईचं विश्व दाखवणाऱ्या या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने जवळपास २७ कोटींचा बिझनेस केला. थिएटर गाजवल्यानंतर आता ‘नाच गं घुमा’ ओटीटी वर धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे.
परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ सिनेमाची कथा प्रेक्षकांना खूपच आवडली. एक साधं सरळ कथानक..एक घर, घरातील पती पत्नी आणि त्यांची मुलगी, आणि एक कामवाली बाई….अत्यंत भावुक मनाला भावणारा विषय रोजचा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय हाताळत परेश मोकाशी यांनी महिला वर्गावर गा केलं..त्यात मुक्ता बर्वे चा सहज अभिनय आणि नम्रता संभेराव चा नटखट अभिनय यांनी मज्जाच आणली…प्रदर्शनाआधीच सिनेमातील गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. ‘नाच गं घुमा’ हे टायटल साँग प्रचंड हिट ठरलं. थिएटरमध्ये बॉलिवूड सिनेमांना तगडी टक्कर दिल्यानंतर आता नाच गं घुमा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे. अॅमेझॉन प्राईम या ओटीटी चॅनेलवर ‘नाच गं घुमा’ सिनेमा नुकताच रिलीज करण्यात आला. त्यामुळे आता घरबसल्या प्रेक्षकांना प्राईम व्हिडिओवर हा सिनेमा पाहता येणार आहे. तर मग चित्रपट बघायचा राहिलाय का.. पाहूनच घ्या…