Amalner

Amalner: अग अग खा.शि. किती खाशी…?

Amalner: अग अग खा.शि. किती खाशी…?

अमळनेर तालुक्यातील खान्देश शिक्षण मंडळाचा भ्रष्टाचारी कारभार संपूर्ण तालुक्याला माहीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खा शि ची भूक काही थांबत नसून शिक्षणाच्या आईचा घो करून ठेवला आहे. पैसे घेवून केलेली बोगस भरती प्रकरण खा शि च्या चांगलेच अंगलट आले असून बोगस भरती प्रक्रिया राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुंबई विभागीय अध्यक्षांनी रद्द केली आहे.यामुळे निकालाच्या आधारावर गुन्हा होणार दाखल होणार असून पुढे काय होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

खान्देश शिक्षण मंडळ ही संस्था २०१६ पासून बरखास्त होती. तरीही संस्थेच्या प्रताप महाविद्यालयाने २६ जणांची केलेली बोगस भरती तक्रारीवरून रद्द करण्यात आली आहे. अशी माहिती खान्देश शिक्षण मंडळाचे १९८६ पासून असलेले सदस्य लोटन चौधरी व माजी चेअरमन दिलीप जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी १७ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमारे आमरण उपोषणास बसण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे. कनिष्ठ महाविद्यायात २२ आणि ४ शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण २६ जणांची बोगस भरती तेव्हा केली होती.
त्याविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

या संदर्भात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुंबई विभागीय अध्यक्ष यांनी २६ जणांनी मान्यता रद्द केली आहे. या निकालावर आधारावर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे मागणी करण्यात आली आहे.

सहाय्यक धर्मदाय आयुक्तांच्या कार्यालयातील परिशिष्टावर त्यांची नावे नाहीत. मुलाखतीत उपस्थित उमेदवाराची मुलाखत कोणत्या निकषाने घेतली. या यासंदर्भात कोणत्याही प्रकारची नोंद नाही सह्यांबाबत पुरावे नाहीत. विशेष म्हणजे सर्व विषयांचे गुणदान अहवाल एकाच व्यक्तीच्या हस्ताक्षरात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

एकूणच खा शि चा बोगस कारभार चव्हाट्यावर आला आहे. आणि संबंधितांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button