Amalner

Amalner: तालुक्यात पावसाचा जोर… अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर शहरातील संत प्रसाद महाराज नगरात घरात घुसले नाल्याचे पाणी..न.प. प्रशासन सुस्त..

Amalner: तालुक्यात पावसाचा जोर… अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर शहरातील संत प्रसाद महाराज नगरात घरात घुसले नाल्याचे पाणी…

अमळनेर अमळनेर तालुक्यात पावसाने धूमाकुळ घातला असुन रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी ठिकठिकाणी साचले आहे . संत प्रसाद महाराज नागरातील घरांमध्ये पाणी घुसले आहे. नाले अरुंद होत आहेत आणि त्यांना गटारीचे स्वरूप मिळत आहे.त्यामुळे पावसाची सुरुवात होताच नाल्याचे पाणी वर येऊन घरात घुसू लागले आहे. पालिकेच्या निष्कळजीपणाचा त्रास सर्व सामान्य जनतेला भोगावा लागत आहे. मान्सूनपूर्व नाला सफाई ( खोदीकरण ) करणे अपेक्षित होते पण पालिकेने ही मोहीम हाती घेतली नसल्याने जनतेस हा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच रसमंजू कॉम्प्लेक्सलां लागून असलेली भिंत पडून सामान्यां दुकानदारांचे 8 तें 10 लाखाचे नुकसान झाले आहे.
तुंबुन भरलेल्या गटारिच्या पाण्याच्या निचरा न झाल्याने हे पाणी रसमंजू कॉम्प्लेक्सच्या भिंतीमध्ये मुरून काही क्षणात ही भली मोठी भिंत पूर्ण कोसळली असुन सारे पाणी या कॉम्प्लेक्सच्या बेसमेंटमध्ये शिरून संपूर्ण पुरुष बुडेल एवढे पाणी यात साचले, पावसामुळे बरेच व्यावसायिक दुकान बंद करून घरी गेले होते. घटनेची माहिती मिळताच त्यांनी धाव घेतली. शक्य होईल तेवढा दुकानातील माल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाणी प्रचंड असल्याने पाण्याचा उपसा केल्याशिवाय पर्याय नव्हता.

तालुक्यातील शिरूड लोंढवे, निसर्डी, वाघोदे, खडके, जानवे शिवारात
ढगफुटी सारखा पाऊस झाला. अमळनेरात 39 मिमी मांडळ ला 81 मिमी पाऊस पडला तर पातोंडा शिवारात 60 मिमी, मारवड मंडळात 60 मिमी पाऊस झाला असुन नगाव ४५, अमळगाव ३०, भरवस ११, वावडे १० असा सरासरी ४३.८८ मिमी पाऊस झाला. आतापर्यंत ८३.२७ मिमी पाऊस झाला आहे.
निसर्डी येथे भरत पाटील, गुलाब पाटील चुनीलाल पाटील, राजू पाटील, महादू पाटील यांच्या शेतातून दुसऱ्या दिवशी देखील मोठ्या प्रवाहात पाणी वाहत होते. शेताचा तलाव झाला होता. राजेंद्र फुला पाटील जानवे, वाघोदे येथे शिवाजी पाटील, रवींद्र पाटील यांच्या शेतात नाल्याचे पाणी घुसल्याने दगड वाहून आले, शेतातील माती व पिके वाहून गेली. एकूणच पावसाळ्याच्या सुरुवातीलाच निसर्गाने आपले रौद्र रूप दाखविण्यास सुरुवात केली असून प्रशासनाने जागे होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवाना त्वरीत नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button