Faijpur

Breaking: बापरे..फैजपुरातील बंद सट्टयाला सावदा पोलिस हद्दीत मोकळे पटांगण..?

फैजपुरातील बंद सट्टयाला सावदा पोलिस हद्दीत मोकळे पटांगण..?

सावदा प्रतिनिधी मुबारक तडवी

फैजपूर येथील बंद असलेल्या कल्याण वरळी सट्टा मटका पेढीचा मटकाकिंगनी सावदा पोस्टेचे हद्दीत डेरा टाकलेला आहे? सावदा पोलिस स्टेशन शहर हद्दीत अवैध धंदे मोकळीकमुळे उडता पंजाब सारखाच सावदा पोलिसांना उडता सावदा होऊ द्यायचाय का? फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे हद्दीतील फैजपूर या सावदा शहराजवळच्या ३ कि.मी.अंतरात असलेल्या फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीत सर्रास पणे कल्याण वरळी सट्टा मटका किंग व बुकी व पत्यांचे जूगार अड्डे चालत होते मात्र फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयास नियुक्त दबंग पोलीस उपअधीक्षक शिस्तप्रिय शिस्तबद्ध खमक्या व कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी मा अन्नापुर्ना सिंग यांनी फैजपूर विभागाचे पदभार घेताच येथील जूगार सट्टा मटकासह अवैध धंदे पुर्णपणे बंद करून हद्दपार केले आहेत.यात काहीएक शंका नाही व दुमतही नाही. मात्र फैजपूर येथील सट्टा मटका चालकांनी नवीन शक्कल लढवून फैजपूर शहर व पोलीस स्टेशन हद्दीत पासून दोन पाऊल पुढे आगेकूच करत संबंधित अवैध धंदे वाईकांनी आपला अवैध धंदा दोन नंबरच्या धंद्याचे साम्राज्य कोणत्याही परिस्थितीत टिकवून सुरू राखण्यासाठी रोजंदारी ने पंटर माणसे लावून सावदा ते फैजपूर दरम्यान मध्यभागी फैजपूर – सावदा रस्त्यावरील सावदा पोलीस स्टेशन हद्दीत खुलेआम व राजेरोसपणे अनेक ठिकाणी सट्टा मटका किंग बुकी अवैध सट्टा बिट घेत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे, याच कल्याण वरळी मिलन मटक्याचे धंद्याद्वारे फैजपूर येथील सट्टा मटका चालविणारे मटका किंग दररोज मोठी लाखांची आर्थिक उलाढाल करीत असून भरमसाठ कमाई करीत असल्याचे आकडा खेळाडूंकडून बोलले जात आहे. तसेच या मटकाकिंग यांनी आपल्या चाणाक्ष दिमाखदार पद्धतीचा अवलंब करीत फैजपूर येथील बंद केलेला अवैध कल्याण वरळी मिलन सट्टा मटका सावदा पोलीस स्टेशन हद्दीत फैजपूर येथील सट्टा मटका चालक मटकाकिंग त्यांचा अवैध धंदा बिनधास्त चालवित आहे. याचे मुख्य कारण असे की, सावदा शहर व पोलीस स्टेशन शहर हद्दीत अवैध धंदे सध्यातरी बिनबोभाट सुरू आहेत सट्टा मटका तर उघडपणे सुरू आहे.तरी याकडे सहा. पोलिस निरीक्षक जालिंदर पळे उपविभागीय पोलिस अधिकारी शिंदे मुक्ताईनगर यांनी विशेष लक्ष देवून फैजपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ज्या प्रमाणे जुगार अड्डे बंद पाडले आहे. तसेच फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी उप अधीक्षक यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याच धर्तीवर येथील सुरू असलेला सदरचा सट्टा मटका सावदा सहाय्यक पोलीस निरीक्षक व मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी तथा उप अधीक्षक कायमचा बंद करतील का?. अशी मागणी वजा अपेक्षा सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button