sawada

Breaking: अवैध गुटखा विक्री बाबत सावदा पोलीसांची बघ्याची भूमिका?:अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

Breaking: अवैध गुटखा विक्री बाबत सावदा पोलीसांची बघ्याची भूमिका?:अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

सावदा ता.रावेर वार्ताहर युसूफ शाह

सावदा :- महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या विमल गुटख्यांसह तंबाखूजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणावर सर्रासपणे विक्री व तस्करी करणाऱ्यांवर राज्य भरात पोलिसांच्या किंवा अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने दिवसाआड कारवाई होत असल्याचे दिसून येते.
परंतू सावदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात सुरू असलेली विमल गुटख्यांसह तंबाखूजन्य पदार्थांची तस्करी आणि या अवैध गुटख्याची थेट दुचाकीद्वारे शहर व परिसरात गल्लीबोळात रात्रंदिवस सर्रासपणे होत असलेली विक्री बाबत अनेक वेळा येथील दैनिक वृत्तपत्रांमध्ये लिखाण करूनही,हप्तेखोरी मुळे की काय?परंतू याकडे सावदा पोलिसांनी बघ्यांची भूमिका घेतल्याचे बोलले जात असून,
अशा भुमिके मुळे गुटखा तस्करांना विक्री व तस्करी करण्यासाठी मोकळे रान मिळालेले दिसून येते.तरी सन २०२१ मध्ये अशाच प्रकारची समसमान प्रस्थितीमुळे अवैध गुटखा विक्री तस्करांनी डोकेवर काढलेले होते.परंतू येथील गुटखा माफियांची नांगी ठेचायला सावदा पोलिस ठाणे बघ्याची भूमिका घेत होते.त्याच दरम्यान जळगाव येथील अन्न व औषध प्रशासन विभागाने गुटखा माफियांवर छापा टाकलेला असता लाखांचा मुद्देमाल जप्त करून थेट सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.अशा कारवाई मुळे त्यावेळी स्थानिक पोलिसांवर एक ना अनेक प्रश्न चिन्ह निर्माण झाली होती.
तरी यावेळी सुद्धा वरीलप्रमाणे पुन:श्च सावदा येथील अवैध गुटखा माफियांसह गल्लीबोळात रात्रंदिवस सर्रासपणे दुचाकीवर गुटखा विक्री करणाऱ्यांविरुद्ध जळगाव येथील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी कारवाई करावी अशी रास्त अपेक्षा जनसामान्यांतून व्यक्त केली जात आहे.

तरी सदरील कारवाई दोन्ही विभागा मार्फत न झाल्यास व्यसनाधीन तरुण व अल्पवयीन मुलांचे नातलगांकडून गल्लीबोळात सर्रासपणे दुचाकीवर अवैध गुटखा विक्री करताना दिसणाऱ्यांना पकडून थेट पोलिसांच्या स्वाधीन करण्याची चर्चा असल्याचे समजते.कदाचित सामन्य जनतेवर अशी वेळ येऊ नये म्हणून याकडे उपविभागीय पोलिस अधिकारी मुक्ताईनगर सह जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button