Faijpur

शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्या ग्रामपंचायती च्या सदस्यांना अपात्र करण्याची मागणी

शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्या ग्रामपंचायती च्या सदस्यांना अपात्र करण्याची मागणी

फैजपुर येथून जवळच असलेल्या पाडळसे ता.यावल

प्रतिनिधी फैजपुर

मौजे पाडळसे येथील ग्रामपंचायत सदस्य तुषार रामचंद भोई व पुनम मनोज पाटील यांनी शासकीय जमिनीवर अवैधपणे अतिक्रमण केले असल्याने त्यांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियमा अंतर्गत अपात्र करण्यात यावे अशी मागणी पाडळसे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा एडवोकेट सुरज मनोहर पाटील यांनी गटविकास अधिकारी यावल यांच्याकडे लेखी स्वरूपात मागणी केली आहे. त्यांनी यावल गटविकास अधिकारी यांना लेखी स्वरूपात दिलेल्या निवेदनात नमूद केली आहे की ग्रामपंचायत सदस्य पुनम मनोज पाटील यांनी गट नंबर 1234 मध्ये शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून जागेचा वापर करत आहे तसेच ग्रामपंचायत सदस्य तुषार रामचंद्र भोई यांनी मौजे पाडळसे गावठाण परिसरातील मालमत्ता क्रमांक 1964 या सरकारी गावठाण जमिनीवर अतिक्रमण करून रहिवास करत आहे सबब त्यांना यावल गटविकास अधिकारी यांनी पाडळसे ग्रामपंचायत सदस्य पुनम मनोज पाटील व तुषार रामचंद भोई यांनी सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याने त्यांना सदस्य पदावरून अपात्र करण्यात यावे या आशयाची मागणी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button