sawada

भाजपा ओबीसी मोर्चा महिला जिल्हा संयोजक पदी डॉ.प्रियदर्शनी सरोदे यांची निवड

भाजपा ओबीसी मोर्चा महिला जिल्हा संयोजक पदी डॉ.प्रियदर्शनी सरोदे यांची निवड

सावदा प्रतिनिधी-मुबारक तडवी

भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चा महिला आघाडीच्या जळगाव (पूर्व ) जिल्हा संयोजक पदी सावदा येथील प्रथित यश प्रसुतीतज्ञ डॉ.प्रियदर्शनी सरोदे यांची नुकतीच निवड करण्यात आली. त्याबाबतचे जिल्हाध्यक्ष श्री.धंनजय पाटील यांच्या स्वाक्षरीचे नियुक्ती पत्र दिनांक 25 रोजी प्रदान करण्यात आले. डॉ.सरोदे या माजी खासदार स्व. गुणवंतरावजी सरोदे यांच्या स्नुषा असून वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी नावलौकिक मिळवलेला आहे. राजकारण तसेच समाजकारणात
हिरारीने सहभाग घेणाऱ्या डॉ. प्रियदर्शिनी सरोदे यांच्या निवडीने ओबीसी मोर्चाच्या महिला आघाडीस बळ मिळणार असल्याचे प्रतिपादन प्रदेश ओबीसी मोर्चाचे सदस्य श्री.भरत महाजन यांनी केले.

याप्रसंगी प्रदेश सदस्य श्री.भरत महाजन यांच्यासह, राष्ट्रीय परिषदेचे डॉ.अतुल सरोदे, वाघोदा बु ll येथील ओबीसी मोर्चाचे श्री. संजय माळी,श्री राहुल पाटील, श्री बाळू काकडे, सावदा शहर अध्यक्ष श्री.जे.के.भारंबे,

सरचिटणीस श्री संतोष परदेशी, श्री महेश अकोले व ओबीसी मोर्चाचे सदस्य उपस्थित होते.

या निवडीबद्दल डॉ सरोदे यांचे केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्य मंत्री ना. श्रीमती रक्षाताई खडसे, ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन, भाजपा महामंत्री श्री विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष पूर्व श्री अमोल जावळे आदींनी अभिनंदन केले.

डॉ. प्रियदर्शनी सरोदे यांचे निवडीबद्दल त्यांचे वर शुभेच्छांचा व कौतुकाचा वर्षाव होत असून परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button