Maharashtra

Good News: विद्यार्थ्यांसाठी आंनंदाची बातमीः एसटी महामंडळाचे मोफत पास आता थेट शाळा-कॉलेजमध्येच मिळणार; प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

Good News: विद्यार्थ्यांसाठी आंनंदाची बातमीः एसटी महामंडळाचे मोफत पास आता थेट शाळा-कॉलेजमध्येच मिळणार; प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी अत्यंत आंनंदाची बातमी समोर आली आहे. आता एसटी महामंडळाचे पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांना रांगेत थांबवण्याची आवश्यकता नाही. तर त्यांचे पासेस थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळाला सूचना देण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला तशा सूचना दिल्या असल्याची माहिती मिळाली आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा शनिवारपासूनच सुरू झाल्या आहेत. त्यामुळे दूरवर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी बसने प्रवास करावा लागतो. त्यासाठी त्यांना सवलत देखील दिली जाते. मात्र, विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते. विद्यार्थ्यांना होणारा हा त्रास थांबवण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून 66% इतकी सवलत दिली जाते. तर केवळ 33% रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहावे लागत होते. विद्यार्थिनींना होणारी गैरसाय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.

18 जून पासून एसटी प्रशासनातर्फे ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ विशेष मोहीम या संदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार 18 जून पासून एसटी प्रशासनातर्फे ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे. विद्यार्थ्यांना मोफत एसटी पासचा वितरण केले जाणार आहे. त्यासाठी आता पाच केंद्रावर जाऊन किंवा आगारात जाऊन पास घेण्यासाठी रांगत उभे राहण्याची गरज नाही. एसटी बसचे पासेस आता थेट शाळेत दिले जाणार आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button