sawada

सावदा येथे गुरुपौर्णिमा महोत्सव । देवीला प्रचार नारळ अर्पण !

सावदा येथे गुरुपौर्णिमा महोत्सव । देवीला प्रचार नारळ अर्पण !

सायंदैनिक एकता सावदा प्रतिनिधी/मुबारक तडवी-

दि २१ जुलै या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संपूर्ण भारतभर तसेच विदेशातही गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने सावदा येथील नगरपालिका सभागृहात देखील २१ जुलै या दिवशी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्त येथील दुर्गादेवी मंदिरात नारळ वाढवून प्रचार प्रसाराचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी समितीचे धीरज भोळे, स्वप्निल पवार, छाया भोळे तसेच सावदा येथील धर्माभिमानी उपस्थित होते. गुरुपौर्णिमा महोत्सवाला जास्तीत जास्त धर्मप्रेमिंनी उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button