Faijpur

हिरवांकुरचे वृक्षसंवर्धनाप्रति क्रांतिकारी पाऊल..न्यायाधीश श्री डी. एन. चामले

हिरवांकुरचे वृक्षसंवर्धनाप्रति क्रांतिकारी पाऊल..न्यायाधीश श्री डी. एन. चामले

फैजपुर प्रतिनिधि सलीम पिंजlरी

नाशिक येथील
हिरवांकुर फाउंडेशनची
वृक्ष दत्तक संकल्पना
सद्यस्थितीत महाराष्ट्रभर चर्चेत आली असून ग्लोबल वार्मिंगच्या महाभीषण परिस्थितीतून देशाला सावरण्यासाठी *हिरवांकुर फाउंडेशन*सज्ज झाले असून येणाऱ्या काळात पर्यावरण संवर्धनाची एक क्रांतिकारी चळवळ उभी राहील असा ठाम विश्वास जामनेर न्यायालयाचे सन्माननीय न्यायाधीश श्री डी. एन. चामले साहेब यांनी व्यक्त केला.

गेल्या महिन्याभरापासून राज्यातील सर्व न्यायालयांच्या माध्यमातून वृक्षदत्तक अभियानाची पूर्वतयारी सुरू आहे. यासाठी ठिकठिकाणी हिरवांकुर टीमचे सदस्य प्रत्येक न्यायालयातील माननीय न्यायाधीश महोदय, विधीज्ञ, सेवक वृंद यांच्या भेटी घेऊन उपक्रमाची माहिती देत आहेत.
व या संकल्पनेला अत्यंत उत्साही व सुंदर प्रतिसाद मिळतो आहे.
सद्यस्थितीत वाढत जाणारे तापमान व घटत जाणारे पिण्या योग्य पाणी यामुळे अवघी मानवजात संकटात सापडली आहे. त्यातच ग्रासलेला शेतकरी आत्महत्या करतो ही चिंतेची व दुःखाची बाब. यावर वेळीच उपायोजना केली नाही तर येणारा काळ अत्यंत भयावह व अवघ्या मानवजातीसाठी धोकेदायक ठरेल. या भीषण परिस्थितीत अल्पसा प्रयत्न म्हणून हिरवांकुर फाउंडेशन, नाशिक यांनी *विद्यार्थी दशेतून हरितसंस्कार हा उपक्रम हाती घेतला व बघता बघता गेल्या तीन वर्षात २४०० शाळांच्या माध्यमातून नऊ लाख विद्यार्थ्यांपर्यंत वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे हरित संस्कार बालमनावर बिंबवले. याचाच एक भाग म्हणून लोकशाहीचा आधारस्तंभ न्यायव्यवस्थेला हाताशी धरून समाजासमोर आदर्श प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने येत्या पाच जून रोजी पावसाचा अभाव व अमाप गर्मी असल्याने प्रतिकात्मक वृक्षारोपण. त्यानंतर दिनांक १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसाच्या औचित्याने एकाच वेळी ४० तालुक्यात *महावृक्षरोपण अभियान*राबविले जाणार आहे. यात विशेषत्वे वृक्षदत्तक संकल्पना आकर्षणाचे केंद्र असून यात भारतीय प्रजातीचे अति दुर्मिळ आयुर्वेदिक दृष्ट्या महत्त्वाच्या वृक्षांचे जसे वड, पिंपळ, चींच, करंज, बहवा, रिठा, ईत्यादी लुप्त होत चाललेल्या भारतीय प्रजातींच्या बाळरोपाचे वाटप होईल. तदनंतर त्यांचे वृक्षाच्या माहितीसह पालकाचे नावही बारकोड द्वारे आपणाला पाहता येईल. येणाऱ्या वर्षांत त्या वृक्षसंवर्धनाचा फॉलोअप घेतला जाईल.
या अभियानासाठी हिरवांकुर फाउंडेशन चे संस्थापक श्री निलयबाबु शाह, ग्रीन सिटी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री विजय वाणी सर, सामाजिक वनीकरण विभाग जळगाव चे डी एफ ओ श्री संजय पाटील साहेब आणि बार असोसिएशन जामनेर हे संयुक्तपणे प्रयत्नशील रहातील.
याप्रसंगी माननिय न्यायमुर्ती श्री डी. एन. चामले साहेब, दिवाणी न्यायाधीश क स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग श्री बी. एम. काळे साहेब, माननीय न्यायाधीश महोदय श्री सूर्यवंशी साहेब, सरकारी वकील श्री सारस्वत साहेब, सहाय्यक अधीक्षक श्री विजय पाटील, श्री बाबुराव चौधरी अध्यक्ष बार असोसिएशन, ॲड. श्री महेंद्र बी पाटील सेक्रेटरी तसेच हिरवांकुर टीमचे सदस्य कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत, समुपदेशिका सौ सोनाली राजपूत, प्रा डॉ डी एस पाटील, श्री विश्वजीत सिसोदे, एन सी सी अधिकारी लेफ्ट डॉ अमर पवार, विधीज्ञ व सेवक वृंद उपस्थित होते.
माननीय न्यायाधीश महोदय विधीज्ञ व सेवक वृंदांनी उपक्रमाचे कौतुक करीत सर्वार्थाने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button