Mumbai

Mumbai: नोकरीचे एकूण वर्षे 19…बदली 21 वेळा…भ्रष्टाचार मुक्त व्यवस्थे बळी न पडणारे तुकाराम मुंढे का खटकतात..?

Mumbai: नोकरीचे एकूण वर्षे 19…बदली 21 वेळा…भ्रष्टाचार मुक्त व्यवस्थे बळी न पडणारे तुकाराम मुंढे का खटकतात..?

मुंबई: बहुचर्चित सनदी अधिकारी आएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली आहे. मुंढेच्यासह इतरही काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पण नेहमी प्रमाणे मुंढे यांची बदली पुन्हा वादग्रस्त ठरली आहे.

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. मुंढे यांच्याकडे आता असंघटित कामगार विभागाच्या आयुक्त पदाची नवी जबाबदारी देण्यात आली आहे. मुंढे यांच्यासह इतरही काही अधिकाऱ्यांच्या बदलींचा निर्णय यावेळी घेण्यात आला असून यात राज्याच्या कुटुंब कल्याण, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त म्हणून अमगोथु श्री रंगा नायक यांची नियुक्ती केली आहे.
केंद्रीय सेवेत प्रतिनियुक्तीवर गेलेल्या व्ही राधा यांची राज्याच्या कृषी विभागाच्या प्रधान सचिव, आणि रणजित कुमार यांची यशदाच्या अतिरिक्त महासंचालक पदी नियुक्ती केली आहे. तर वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांच्याकडे असलेल्या सध्याचा कार्यभार राजेश कुमार यांच्याकडे देण्यात आला आहे.

दरम्यान, ऑक्टोबरच्या सुरुवातीला राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक आणि आरोग्य सेवा आयुक्त म्हणून नियुक्त झालेले आएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची मंगळवारी बदली करण्यात आली. मागील सहा वर्षातील त्यांची ही नववी बदली आहे.

धडाडीचे प्रामाणिक अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांची संपूर्ण राज्यभरात ओळख आहे. २००५ मध्ये तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या पहिल्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. ते सोलापूरचे उपजिल्हाधिकारी म्हणून पहिल्यांदा रुजू झाले होते. त्यांच्या 19 वर्षांच्या कारकिर्दीत मुंबईसह सोलापूर, नागपूर, पुणे, कल्याण अशा अनेक ठिकाणी तब्बल 21 वेळा बदली करण्यात आली आहे.

आत्तापर्यंत कधी व कुठे झाली बदली
ऑगस्ट 2005 – प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर
सप्टेंबर 2007 – उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग
जानेवारी 2008 – सीईओ, जिल्हा परिषद नागपूर
मार्च 2009 – आयुक्त, आदिवासी विभाग
जुलै 2009 – सीईओ, वाशिम
जून 2010 – सीईओ, कल्याण
जून 2011 – जिल्हाधिकारी, जालना
सप्टेंबर 2012 – विक्रीकर सहआयुक्त मुंबई
नोव्हेंबर 2014 – सोलापूर जिल्हाधिकारी
मे 2016 – आयुक्त, नवी मुंबई महापालिका
मार्च 2017 – मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे
फेब्रुवारी 2018 – आयुक्त, नाशिक महापालिका
नोव्हेंबर 2018 – सहसचिव, नियोजन
डिसेंबर 2018 -प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई
जानेवारी 2020 – आयुक्त, नागपूर महापालिका
ऑगस्ट 2020 – सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई
जानेवारी 2021 – राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत
सप्टेंबर – 2022 – आयुक्‍त आरोग्‍य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान
29 नोव्हेंबर 2022 –
जून 2022 – मराठी भाषा विभाग
जुलै 2022 – पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभाग
जून 2023 – विकास आयुक्त (असंघटित कामगार)

तुकाराम मुंढे यांच्यासह इतरही काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. रणजीत कुमार, नीमा अरोरा, व्ही. राधा, अमन मित्तल, अमगोथू श्रीरंगा नायक, रोहन घुगे यांच्याही बदल्या झाल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button