sawada

Sawada: सावदा पालिका कर्मचारी मजदुर संघटनेच्या अध्यक्ष पदी विश्वास उर्फ राजू साळी यांची एकमताने निवड

Sawada: सावदा पालिका कर्मचारी मजदुर संघटनेच्या अध्यक्ष पदी विश्वास उर्फ राजू साळी यांची एकमताने निवड

सावदा ता.रावेर वार्ताहर युसूफ शाह

सावदा :- येथील पालिका वसुली विभागात सावदा न.पा.भारतीय मजदूर संघ प्रणित ज.ति.पालिका मजदूर संघ सावदा शाखेच्या कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण सभा आज दि.२१ जून रोजी दुपारी १ वाजता घेण्यात आली.सभेच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा नगरपालिका मजदुर संघाचे आयोजित जिल्हा सरचिटणीस वि.जे.पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून संघटनेचे माजी अध्यक्ष सुरेश मनोहर पाटील उपस्थित होते.संघटनेची नविन कार्यकारणीची निवड करणे बाबतच्या प्रमुख विषयानुसार या सभेत एकमताने संघटनेच्या अध्यक्ष पदी पालिका वाचनालयात कार्यरत विश्वास पोपट साळी उर्फ राजू साळी यांची निवड करण्यात आली.या प्रसंगी सर्व उपस्थितांनी पुष्पहार घालून टाळ्याच्या वाजवून नविन अध्यक्ष राजू साळी यांचावर अभिनंदनाचा वर्षाव केला.व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.याच पद्धतीने
उपाध्यक्ष विशाल करोशिया, कार्याध्यक्ष हमीद तडवी,सचिव आकाश तायडे,उपसचिव रुपा नेमाडे,कोषाध्यक्ष,रामा बेंडवाल, सदस्य अरूण ठोसरे,विजय चौधरी,सौ.अर्चना जेदीये,संदिप वाणी,सौ.पुजा लोखंडे,सौ.वैशाली करोशिया यांची निवड होवून संघटनेची नविन कार्यकारिणीत तयार करण्यात आली आहे.

*कर्मचाऱ्यांवर अन्याय होवू देणार नाही*

माझे सर्व कर्मचारी बांधवांनी मला संघटनेचा अध्यक्ष केला त्यांचे विश्वासाला मी तळा जाऊ देणार नाही.कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देण्यास मी कुठेही कमी पडणार नाही. सर्वप्रथम ३ वर्षांपासून कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम व पगार वेळेवर मिळत नाही,तसेच कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम दिले जात आहे.यबद्दल कायद्याच्या चौकटीत राहून आवाज बुलंद करणार आहे.असे यावेळी माध्यमांशी बोलताना ठामपणे संघटना अध्यक्ष राजू साळी यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button