Motha Waghoda

तडवी द गाईड सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम अविरत ६ वर्षापासून करतायेत वृक्षारोपण

तडवी द गाईड सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम अविरत ६ वर्षापासून करतायेत वृक्षारोपण

प्रतिनिधी सावदा मुबारक तडवी

दि २१जून तडवी द गाईड भुसावळ या सामाजिक संस्थेचा वृक्षवल्ली आम्हा सोयरे….या उद्देशाने सलग मागील सहा वर्षांपासून सुरू केलेला दत्तक वृक्षरोपणाचा स्तुती पात्र उपक्रम या वर्षीही तडवी द गाईड या सामाजिक आणि पर्यावरण प्रेमी संस्थेने आयोजित केला होता.

पूर्वी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांची घटती संख्या आणि रस्त्यांचे रुंदीकरण करताना झालेली वृक्षतोड लक्षात घेवून यावर्षी फैजपूर कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला वटवृक्षांची लागवड करून वृक्षारोपणाची सुरुवात करण्यात आली.

दिवसेंदिवस वृक्षतोडीमुळे वृक्षांची संख्या घटत आहे. वड व पिंपळ आपल्या पौराणिक महत्वासोबतच निसर्गात जास्तीत जास्त ऑक्सीजनचा पुरवठा करतात. येत्या पावसाळयात मोठ्या प्रमाणात वटवृक्षांची लागवड करुन वृक्षारोपण कार्यक्रमास हातभार लावून, निसर्ग रक्षणास सहकार्य करा, असे आवाहन प्रकल्प प्रमुख अशफाक जरदार तडवी यांनी केले.वाढते तापमान आणि कमी होणारे पावसाचे प्रमाण यावरही प्रबोधन करण्यात आले. याप्रसंगी संस्थाध्यक्ष संजय बुरहान तडवी, सलीम नशिर तडवी, विजय लालू कोळी, मयूर श्याम तायडे, हर्षल मोरेश्वर तायडे, अरसलान अशफाक तडवी, अरहान अशफाक तडवी, संजय अनिल मानकर, राजू अनिल मानकर, अमित शरीफ तडवी, झुल्फिकार लतिफ तडवी, वजीर निजाम तडवी, जावेद सिराज तडवी, हमजान पिरखा तडवी, तस्लिम रशीद तडवी, रिदा रफीक तडवी, मोहसीन शेखर तडवी, याकूब सिकंदर तडवी आणि हुसेन इब्राहिम तडवी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button