Rawer

रावेर विधानसभा मतदार संघातून भाजपाचा भावी दावेदार कोण..?

रावेर विधानसभा मतदार संघातून भाजपाचा भावी दावेदार कोण

फैजपूर प्रतिनिधी

रावेर लोकसभा मतदार संघाची निवडणूक आटोपल्यानंतर आता रावेर विधानसभा मतदार संघाचे वारे वाहू लागले असून त्यामुळे भाजपाचा या प्रमुख दावेदारांमधून भावी दावेदार कोण याकडे आता रावेर विधानसभा मतदार संघातील मतदारांचे लक्ष लागले असून यामध्ये लेवा पाटीदार समाजाचे फैजपुर चे माजी नगराध्यक्ष पांडुरंग दगडू सराफ अमोल दादा जावळे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद दादा महाजन या नावांची चर्चा आता जोर धरू लागली आहे

या तिघा नावांपैकी यामधून एका नावाचा शिक्कामोर्तब होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे

रावेर लोकसभा मतदार संघाची निवडणूक आटोपल्यानंतर आता रावेर विधानसभा मतदारसंघाचे वारे वाहू लागले आहे रावेर लोकसभा मतदार संघातून खासदार रक्षाताई निखिल खडसे यांना जवळपास 36 हजाराची लीड या मतदार संघामधून मिळाल्यामुळे रावेर विधानसभा मतदार मतदार संघामध्ये भाजपामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे भाजपाच्या उमेदवारीसाठी रावेर विधानसभेसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे यामध्ये प्रमुख दावेदारांमध्ये फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग दगडू सराफ तसेच अमोल दादा जावळे आणि मा जि प सदस्य शरद दादा महाजन हे रावेर विधानसभा मतदार संघासाठी इच्छुक असून त्यांचे वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुद्धा सुरू असल्याचे बोलले जात आहे समाजकार्यात अग्रेसर मानले जाणारे फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग दगडू सराफ यांनी नगराध्यक्ष असताना पाच वर्षात त्यांनी फैजपूरच्या जनतेसाठी चौफेर काँक्रिटीकरण डांबरीकरण पाण्याची व्यवस्था त्यावेळेस त्यांनी नागरिकांना कोणतेही समस्या भासणार नाही अशा मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली होती फैजपूरच्या जनतेसाठी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी अनेक विकास कामे करून एक वेगळा ठसा उमटविलेला आहे तसेच अनेक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून वेगवेगळ्या संस्थांमार्फत ते बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देत असल्यामुळे ते खरे रावेर भाजपाचे उमेदवार म्हणून दावेदार असल्याचे मानले जात आहे तसेच माजि खासदार कृषी मित्र स्वर्गवासी हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल दादा जावळे यांनी सुद्धा त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून गेल्या अनेक वर्षापासून समाजकार्य सुरू ठेवले असून यावेळेस ते भाजपाचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवारीचे दावेदार होते परंतु यावेळेस त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे ते आता रावेर विधानसभेसाठी इच्छुक आहेत तसेच सहकार महर्षी माजि गृहराज्यमंत्री स्वर्गवासी दादासाहेब जेटी महाजन यांचे पुत्र शरद दादा महाजन यांनी तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य पद यशस्वीपणे सांभाळत रावेर यावल तालुक्यात अनेक वेगवेगळ्या योजनेमार्फत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था रोड काँक्रीटीकरण डांबरीकरण करून मोठ्या प्रमाणावर विकास कामे केलेली आहेत आणि ते आज सुद्धा अनेक शिक्षण संस्था यशस्वीपणे सांभाळत आहे त्यामुळे ते सुद्धा या रावेर विधानसभेसाठी इच्छुक आहे फैजपुर चे माजी नगराध्यक्ष हे लेवा पाटीदार समाजाची असून तसेच अमोल दादा जावळे शरद दादा महाजन हे तिघे दावेदार लेवा समाजाची असल्यामुळे हा रावेर मतदार संघ लेवा समाजाचा बालेकिल्ला मानला जातो म्हणून हे तिन्ही दावेदार मानले जात आहे या तिघा दावेदारांमधून कोणाला भाजपाची रावेर विधानसभेची उमेदवारी मिळते याकडे रावेर विधानसभेच्या मतदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button